दिलासा दायक: पालघर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर 10% च्या खाली

0
2451

पालघर, दि. 1 जुलै: जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर 9.50% इतका राहिल्याने व हा दर 10% पेक्षा कमी असल्याने तूर्तास जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर होण्याचा धोका कमी झाला आहे. 27 जून रोजी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 15.75% व 29 जून रोजी 10.35% इतका आला होता. 28 जून रोजी मात्र पॉझिटिव्हीटी दर 6.56% इतका खाली आला व सरासरी दर 10% पेक्षा खाली राहिला.

पालघर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1 लक्ष 25 हजार 213 जण तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यातील 1 लक्ष 21 हजार 72 लोक बरे झाले. 2 हजार 710 जणांचा मृत्यू झाला. 13 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू अन्य कारणाने झाला. आजमितीस जिल्ह्यामध्ये 1 हजार 418 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments