पालघर जिल्ह्यात 2 दिवसांत कोरोना पॉझिटिव्हीटी दर 10% पेक्षा जास्त झाला! लेव्हल 4 च्या कडक निर्बंधांची टांगती तलवार!

0
3002

पालघर जिल्ह्याने 26 व 27 जून या 2 दिवसांत कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 10% पेक्षा जास्त नोंदवला आहे. 25 जून पर्यंत तो 7.5% होता. त्यामुळे जिल्ह्यावर लेव्हल 3 चे निर्बंध लावण्यात आले होते. 26 व 27 जून रोजी मात्र हा दर अनुक्रमे 13.8 व 12.9 झाला आहे. लोकांनी कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा पॉझिटिव्हीटीचा दर असाच वाढल्यास, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालघर जिल्ह्यावर लेव्हल 4 चे निर्बंध लादले जातील व हे निर्बंध किमान 2 आठवड्यांसाठी असतील असा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिला आहे.

पालघर जिल्ह्यावर लेव्हल 4 चे निर्बंध लावल्यास केवळ जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत खूली ठेवण्यास अनुमती मिळेल व हॉटेलना केवळ पार्सल सेवा पुरविण्याची परवानगी असणार आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील त्यांनी Rapid Antigen Test करावी व ह्या तपासणीचा निकाल निगेटिव्ह आल्यास RT-PCR तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गुरसळ यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments