कोरोना पॉझिटिव्हीटी दर काढताना केवळ RT-PCR तपासणीची आकडेवारी घेणार! Antigen तपासणीची आकडेवारी विचारात घेतली जाणार नाही! पालघर जिल्हा स्तर 3 मध्ये कायम!

0
2037

Rajtantra Media (25 जून 2021) : महाराष्ट्र सरकारने कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर काढताना केवळ RT-PCR तपासणीची आकडेवारी विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा दर काढताना Antigen तपासणीचा विचार केला जाणार नसल्याने पालघर जिल्हा 5 स्तरीय विभागणीमध्ये 3 ऱ्या स्तरावरच रहाणार आहे. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत पालघर जिल्ह्यावर सध्या लागू असणारे निर्बंध पुढेही लागू रहाणार आहेत. कोव्हिड चे डेल्टा व डेल्टा प्लस हे नवीन अवतार महाराष्ट्रात आढळल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी शासनाने अधिक दक्षतेची भूमिका घेतली आहे.

पालघर जिल्ह्यात 17 जून ते 23 जून दरम्यानच्या काळात 30,501 जणांचे स्वॅब घेतले व त्यातील 1215 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हीटीचा हा दर 3.98% असला तरी त्यातील 20,956 Antigen तपासणी व केवळ 9,545 जणांच्या RT-PCR तपासणी करण्यात आल्या होत्या. 9,545 RT-PCT तपासणीतून 704 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. हा दर 7.4% इतका येत असल्याने व तो 5% पेक्षा अधिक असल्याने पालघर जिल्ह्यावरील लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments