पालघर जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण आढळला; राज्यभरात 21 रुग्ण बाधीत

0
1550

मुंबई, दि.22 : राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधित 9 रुग्ण रत्नागिरीत, 7 रुग्ण जळगावात, 2 रुग्ण मुंबईत, तर पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल, २१ जुने रोजी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली. तसेच या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत.

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येत असुन सदर रुग्णांनी मागील काही दिवसांमध्ये केलेला प्रवास, त्यांचे लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लग्न झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे, अशी माहिती टोपेंनी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments