पालघर जिल्हा पुन्हा लेव्हल 3 मध्ये; 21 जूनपासुन निर्बंध वाढणार

0
8664

पालघर, दि. 18 : जिल्ह्याचा मागील आठवडाभरातील करोना पॉझिटिव्ही दर 5 पेक्षा अधिक (5.18) व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 18.24 टक्के झाल्याने जिल्ह्याचा पुन्हा तिसर्‍या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आहे. त्यामुळे आता निर्बंधात पुन्हा वाढ होणार असुन सोमवार, 21 जूनपासुन पूर्वीचेच निर्बंध लागू होणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज, शुक्रवारी याबाबतचे नवीन आदेश जारी केले आहेत.

काय होते पुर्वीचे नियम :

 • अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापने सोमवार ते रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर शनिवार व रविवार बंद राहतील.
 • मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे पुर्णपणे बंद राहतील.
 • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 4 वाजेनंतर पार्सल, टेक अवे (घेवून जाणे) व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील.
 • सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंगसाठी सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी राहिल.
 • खाजगी आस्थापना व कार्यालये कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
  8) बाह्य मैदानी खेळ सोमवार ते रविवार पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
 • विवाह समारंभास केवळ 50 व्यक्तींना परवानगी असेल.
 • अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तींना परवानगी असेल.
 • संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी राहील. तर 5 वाजेनंतर संचारबंदी लागू असेल.
 • वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये (स्थानिक संस्था/सहकारी संस्था) हॉलच्या 50 टक्के उपस्थिती राहिल.
 • बांधकाम केवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहणार्‍या मजुरांवर सुरु राहिल. किंवा कामगारांना संध्याकाळी 4 वाजता सोडणे बंधकारक राहिल.
 • कृषी संबंधित दुकाने सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • ई-कॉमर्स नियमितपणे सुरु राहील.
 • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के आसन क्षमतेने सुरु राहिल. मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही.
 • जिम, सलुन ब्यटी पार्लर स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. ग्राहकांना पुर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच एसीचा वापर करता येणार नाही.
 • आंतरजिल्हा प्रवार नियमितपणे सुरु राहील. परंतू 5 व्या स्तरातील जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असेल.
 • अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त नागरिकांना सायंकाळी 05.00 वाजेनंतर मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील.

दरम्यान, मागील आठवड्यात जाहीर झालेल्या आकडवारीनुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 27.66 टक्के असल्याने जिल्ह्याचा लेव्हल 3 मधुन लेव्हल 2 मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे 14 जूनपासुन अनेक निर्बंध पूर्णपणे शिथिल झाले होते. विशेष म्हणजे सर्वच दुकानांना नियमितपणे दुकाने सुरु ठेवण्याची सवलत मिळाली होती.

Print Friendly, PDF & Email

comments