पालघर जिल्हा अनलॉक; सविस्तरपणे जाणून घ्या नवे नियम!

पालघर जिल्हाधिकार्‍यांकडून स्वतंत्र आदेश जारी

0
3839

पालघर, दि. 6 : महाराष्ट्र राज्यात बे्रक द चेन अंतर्गत उद्या, 7 जुनपासुन अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. करोनाचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सीजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर पाच स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी करुन ही अनलॉक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 40 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने पालघर जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या स्तरामध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार पालघर जिल्हाधिकार्‍यांमार्फत जिल्ह्यासाठी तसे स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत.

नवे नियम खालीलप्रमाणे :

 • अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापने सोमवार ते रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर शनिवार व रविवार बंद राहतील.
 • मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे पुर्णपणे बंद राहतील.
 • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 4 वाजेनंतर पार्सल, टेक अवे (घेवून जाणे) व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील.
 • सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंगसाठी सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी राहिल.
 • खाजगी आस्थापना व कार्यालये कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
  8) बाह्य मैदानी खेळ सोमवार ते रविवार पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
 • विवाह समारंभास केवळ 50 व्यक्तींना परवानगी असेल.
 • अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तींना परवानगी असेल.
 • वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये (स्थानिक संस्था/सहकारी संस्था) 50 टक्के उपस्थिती राहिल.
 • बांधकाम केवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहणार्‍या मजुरांवर सुरु राहिल. किंवा कामगारांना संध्याकाळी 4 वाजता सोडणे बंधकारक राहिल.
 • कृषी संबंधित दुकाने सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • ई-कॉमर्स नियमितपणे सुरु राहील.
 • संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी राहील. तर 5 वाजेनंतर संचारबंदी लागू असेल.
 • जिम, सलुन ब्यटी पार्लर स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. ग्राहकांना पुर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच एसीचा वापर करता येणार नाही.
 • आंतरजिल्हा प्रवार नियमितपणे सुरु राहील. परंतू 5 व्या स्तरातील जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असेल.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना :-
1) अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त नागरिकांना सायंकाळी 05.00 वाजेनंतर मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील.
2) ज्यावेळी ई-पास आवश्यक असेल त्यावेळी वाहनातील सर्व प्रवाशांकडे वैयक्तीक स्वतंत्र ई-पास असणे आवश्यक आहे. प्रवासांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही.
3) कोविड-19 च्या व्यवस्थापनाकरिता आवश्यक शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये उपस्थिती 100 टक्के राहील, इतर सरकारी कार्यालयात 50% जास्त क्षमतेने कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने उपस्थित राहतील.

 • अत्यावश्यक सेवेत खालील बाबी समाविष्ट असतील-
 1. रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा तसेच त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चा माल आणि अनुषंगिक सेवेशी संबंधित उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल.
 2. शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा/दवाखाने, पशु निवारा व त्यांची खादय दुकाने.
 3. वन विभागाने जाहीर केलेेले वनीकरण संबंधित सर्व कामकाज.
 4. विमानचलन आणि संबंधित सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभाल दुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सव्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)
 5. किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्रते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटन, मासे, अंडी आणि पेल्ट्री दुकाने)
 6. शितगृहे आणि साठवणकीची गोदाम सेवा.
 7. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे- विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ओटोरिक्षा व सार्वजनिक बसेस.
 8. पावसाळापूर्व तयारी करीता आवश्यक सर्व गतविधी.
 9. स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व सार्वजनिक सेवा.
 10. बॅकींग व वित्तीय सेवा.
 11. सेबी अंतर्गत कार्यालये.
 12. दुरध्वनी व संचार सेवा.
 13. माल वाहतूक सेवा.
 14. पाणी पुरवठा सेवा
 15. शेती संबंधित सर्व कामकाज आणि शेती विषयक कामकाज अखंडीत सुरु राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पुरक सेवा जसे- बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज.
 16. ई-कॉमर्स (फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठ्याशी निगडीत)
Print Friendly, PDF & Email

comments