ब्रेक द चेन : दुकानदारांमध्ये गोंधळ; बोईसरमध्ये पोलिसांनी परवानगी नसलेली दुकाने केली बंद!

0
537
संग्रहित छायाचित्र

बोईसर, दि. 2 : अत्यावश्यक सेवा नसलेली लाँड्री, स्टेशनरी, झेरॉक्स, फुटवेअर, इलेक्ट्रिक व हार्डवेअर, कटलरी, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फोटो स्टुडिओ, टेलरींग शॉप आदी दुकाने उघडण्याबाबतच्या स्पष्ट आदेशानंतरही बोईसरमधील जवळपास सर्वच दुकानदारांनी आपली दुकाने 1 जूनपासुन उघडल्याने बोईसर पोलिसांनी आज, बुधवारी यांपैकी परवानगी नसलेली दुकाने बंद केली व पुढील आदेशापर्यंत दुकाने बंदच ठेवण्याची सुचना संबंधित दुकानदारांना केली आहे.

पालघर जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचे प्रमाण काही प्रमाणात मंदावल्याने 1 जूनपासुन अत्यावश्यक सेवा नसणार्‍या काही निवडक प्रकारच्या दुकानांना तालुक्यांमधील रुग्णसंख्येनुसार वर्गवारी करुन दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पालघर तालुक्यातील रुग्णसंख्या पाहता येथे सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात परवानगी असलेल्या दुकानांचे प्रकार स्पष्टपणे नमुद असुन लाँड्री, स्टेशनरी, झेरॉक्स, फुटवेअर, इलेक्ट्रिक व हार्डवेअर, कटलरी, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फोटो स्टुडिओ व टेलरींग शॉप आदींचा यात समावेश आहे. असे असताना बोईसर परिसरातील दुकानदारांमध्ये याबाबत गोंधळ दिसुन आला व त्यातून परवानगी नसलेल्या दुकानदारांनीही काल, 1 जुनपासुन आपली दुकाने उघडली होती. ही बाब समोर आल्यानंतर आज बोईसर पोलिसांनी कपडे, ज्वेलर्स, गॅरेज, भांड्यांची दुकाने, अशाप्रकारची परवानगी नसलेली दुकाने बंद करत शासनाच्या पुढील आदेशापर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याच्या सुचना संबंधित दुकानदारांना केल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments