पालघर जिल्ह्यात निर्बंध शिथिल; सलून / लॉंड्री सेवा सुरु!

0
5173

दिनांक 31 मे 2021 : पालघर जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत लादलेल्या निर्बंधात काहीशी सवलत जाहीर करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी 15 जून 2021 पर्यंतचे नवे आदेश पारित केले आहेत.

पालघर, वसई (ग्रामीण), डहाणू व वाडा तालुक्यांतील दुकाने सोमवार ते शुक्रवार, सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत उघडी राहतील. तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड व तलासरी येथील दुकाने सोमवार ते शुक्रवार, सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहतील.

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे अत्यावश्यक नसलेल्या सेवा सुरु रहातील :-
सलून व लॉंड्री, स्टेशनरी, झेरॉक्स, फुटवेअर, इलेक्ट्रिक व हार्डवेअर, कटलरी, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फोटो स्टुडिओ, टेलरींग शॉप इत्यादी.

कृषिविषयक दुकाने सोमवार ते शनिवार, सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडी राहतील.

Print Friendly, PDF & Email

comments