बोईसर, दि. 14 : आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार देशभरात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत गरोदर माता व नवजात बालकांना संसर्गाचा अधिक धोका वर्तविण्यात आल्याने पुर्वतयारी म्हणून बोईसरमधील टिमा हॉस्पिटलमध्ये 50 बेड वाढवण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज, शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, टिमा कोव्हिड रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर अधिकच्या 50 बेडची व्यवस्था करण्याची परवानगी देण्यात आली आहे. करोनाची तिसरी लाट आल्यास यात गरोदर माता व नवजात बालकांना संसर्गाचा अधिक धोका असल्याने मॅटर्निटी युनिट व नियोनेटल (नवजात) युनिट सुरु करण्याच्या उद्देशाने नियोजन करावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.