बोईसर एमआयडीसीत भीषण आग!

0
2320

बोईसर, दि. 13 : येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) ग्रीन झोन म्हणून राखीव असलेल्या कुंभवली पोलीस चौकीसमोरील (प्लॉट नं. एन) जागेत भीषण आग लागली आहे. एमआयडीसीच्या नव्या सीईटीपी प्लांटसाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकच्या मोठ-मोठ्या पाईपांचा येथे साठा करुन ठेवण्यात आला असुन याच आग लागल्याची माहिती आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग इतकी भीषण आहे की, काही किलोमीटरच्या अंतरावरुन धुराचे लोट दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या पाईपांच्या शेजारी एक केमिकल टँकर उभा होता. या टँकरला अचानक आग लागली व पुढे हि आग वाढत जाऊन पाइपांनी पेट घेतला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नसले तरी पाईप जाळून खाक झाल्याने एमआयडीसीचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते.

सविस्तर बातमी लवकरच…

Print Friendly, PDF & Email

comments