अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती; 45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता

जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाना सावधानतेचा इशारा

0
795
संग्रहित छायाचित्र

पालघर, दि. 12 : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. भारताच्या हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असुन या पार्श्‍वभुमीवर पालघर उप जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील मच्छीमार बांधावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे 14 मे ते 16 मे या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनार्‍यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच 16 मे 2021 रोजी महाराष्ट्र-गोवा किनार्‍यावर 45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने सर्व मच्छीमार व समुद्र किनार्‍यावरील गावांना सावधनतेचा इशारा देण्यात येत असून 15 मे व 16 मे 2021 या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments