पालघरमधील 103 वर्षीय आजोबांची करोनावर यशस्वी मात, जिल्हाधिकार्‍यांनी केले अभिनंदन

0
938

पालघर, दि. 10 : आठवड्याभरापूर्वी करोनाची लागण झालेल्या 103 वर्षीय आजोबांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या जीवघेण्या आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. शामराव इंगळे असे या आजोबांचे नाव असुन ते पालघरमधील विरेंद्रनगर भागातील रहिवासी आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पालघर जिल्हाधिकार्‍यांनी आजोबांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे यांना करोनासदृश्य लक्षणे असल्याने सात दिवसांपुर्वी त्यांची करोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पलघरमधील करोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. सुरुवातीला आजोबा अन्नपाणीही घेत नसल्याने त्यांच्या कुटूंबात चिंतेंचे वातवरण होते. मात्र जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला व आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना काल, शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अनेक रुग्णांना उपचार केंद्रात दाखल केल्यानंतर भितीमुळे त्यांची प्रकृती खालावते. मात्र शामराव इंगळे यांनी खंबीरपणे करोनाविषाणूशी लढा देत त्यावर मात केली. उपचारादरम्यान रुग्णालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी योग्य ती काळजी घेतल्याने आजोबांनी सर्वांचे आभार मानले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी रुग्णालयाला भेट देत इंगळे यांचे पुष्प देऊन अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email

comments