जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा दोन लाखाच्या पार!

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची माहिती; पालघर तालुक्यात सर्वाधिक 59,771 जणांचे लसीकरण!

0
597

पालघर, दि.27 : जिल्ह्यामधील आठ तालुक्यात 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करून जिल्ह्याने कमी कालावधीत दोन लाखाचा आकडा पार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण 88 लसीकरण सत्र असून 71 शासकीय तर 17 खाजगी सत्रांमधून दैनंदिन साधारण 6 हजार 600 व्यक्तींना लस दिली जाते. आतापर्यंत 1 लाख 74 हजार 645 जणांना पहिला डोस दिला गेला, तर 32 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याचे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

तालुकानिहाय लसीकरणामध्ये डहाणू 18 हजार 558, जव्हार 4 हजार 443, मोखाडा 2 हजार 281, पालघर 59 हजार 771, तलासरी 2 हजार 485, वसई (ग्रामीण) 13 हजार 526, विक्रमगड 4 हजार 235 तर वाडा तालुक्यात 10 हजार 882 जणांचे लसीकरण करण्यात आले असुन अशाप्रकारे पालघर ग्रामीणमध्ये 1 लाख 16 हजार 181 व वसई विरार महापालिका क्षेत्रातील 91 हजार 668, असे एकूण 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments