26 एप्रिल पासून डहाणू शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा

0
1530

दि. 23 एप्रिल: डहाणू नगरपरिषद 26 एप्रिल पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करणार आहे. सध्या नव्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत ही समस्या संपुष्टात येईल. मात्र तोपर्यंत याप्रमाणे पाणीपुरवठा होईल असे नगरपरिषदेतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

पुढील क्षेत्रात, सोमवारी व त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल: डहाणूगाव, आगर, प्रभुपाडा, मसोली, एस. टी. डेपो, विद्युत नगर, वडकुण पाटीलपाडा, चिमणीपाडा, आंबेडकर नगर, घाचिया, पानखाडी, कंक्राडी, पाटीलपाडा, आंबेमोर (वेळेत बदल नाही).

पुढील क्षेत्रात, मंगळवार पासुन एक दिवस आड (वेळेत बदल नाही) पुढील क्षेत्रात होईल: पटेलपाडा, रमटेकडी, छत्रीकंपाऊंड, मोहननगर, सुमरीपाडा, बोहलीपाडा, तलावपाडा, शिवाजीनगर, रामवाडी, तन्ना कंपाऊंड, संजयनगर, ईराणीरोड, काटीरोड, लोणीपाडा.

Print Friendly, PDF & Email

comments