पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा!

गरजू कोव्हिड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेकशन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे! -पालकमंत्री दादाजी भुसे

0
1461

पालघर, दि. 20 : गरजू कोव्हिड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. करोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने उपलब्ध करावा, असे निर्देश कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

वसई विरार महापालिका येथे जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थिती बाबतपालकमंत्री भुसे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पालकमंत्री ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त डी. गंगाथरण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेत आवश्यक त्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लवकरच रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील, असे सांगतानाच यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments