अखेर दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली; मे-जुनमध्ये होणार परीक्षा

0
637

मुंबई, दि. 12 : राज्यातील करोना संसर्गाची स्थिती पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडीओद्वारे ही माहिती दिली आहे. आता बारावीची परीक्षा मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जुनमध्ये घेण्याचे नियोजित आहे.

गेल्या महिन्याभरापासुन राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा घेण्याबाबत पेच निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत परिक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने परिक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी होत होती. या पार्श्‍वभुमीवर आज शिक्षण विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अखेर या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Print Friendly, PDF & Email

comments