अखेर, डहाणूचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासेंची उचलबांगडी; झाले मुख्यालयात जमा!

0
3206

डहाणू दि. 26 मार्च: डहाणूचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे. रात्री उशीरा याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ओमासे यांच्या विरोधात अनेक तक्रारी उद्भवल्या होत्या. डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी देखील त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र वेळोवेळी ओमासेंना अभय मिळाले. जिल्ह्यात दुसरे पोलीस निरीक्षक उपलब्ध नसल्याचे सांगून आमदारांना शांत केले. असे असले तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड चंद्रकांत घोरखाना सतत पाठपुरावा करीत होते. 24 मार्च रोजी मात्र ओमासेंच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या पिस्तुलातून गोळी सुटली व पोलीस अधिक्षकांनी त्यांना मुख्यालयात जमा केले आहे. ओमासेंची विभागीय चौकशी देखील केली जाणार असल्याचे समजते.

ओमासे हे 24 मार्च पासून सुट्टीवर जाणार असल्याने त्यांनी त्यांचे पिस्तूल जमा करण्यासाठी महिला पोलीसाकडे दिले. पिस्तूल जमा करताना आधी त्यातील काडतूस काढणे गरजेचे होते. महिला पोलीसाने पिस्तूल हाताळताना त्यातून गोळी सुटली. त्यानंतर ओमासेंनी स्वतःकडे पिस्तूल घेताना त्यांच्याही हातून गोळी सुटली. सुदैवाने दोन्ही गोळ्यांपासून जीवितहानी झाली नाही.

Print Friendly, PDF & Email

comments