कोरोना: एक दिवासात पालघरमध्ये 53 तर डहाणूत 30 व्यक्तीना संसर्ग

0
3300

दि. 25: पालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडेवारी वाढीस लागली असून काल एका दिवसात पालघर तालुक्यात 53 व डहाणू तालुक्यात 30 कोरोना बाधितांची भर पडली आहे. वसई विरार महानगर क्षेत्रामध्ये सर्वाधिक 198 बाधित निष्पन्न झाले आहेत. मोखाडा व वाडा तालुक्यामध्ये अनुक्रमे 4 व 2 बाधितांची भर पडली आहे.

जिल्ह्यात एकूण 1530 ॲक्टीव रुग्ण असून त्यामध्ये 946 वसई विरार महानगर क्षेत्रातील, पालघर तालुक्यातील 373, डहाणू तालुक्यातील 52, जव्हार व वाडा तालुक्यातील प्रत्येकी 46, मोखाडा 42, वसई ग्रामीण क्षेत्रातील 26 व तलासरी तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. विक्रमगड तालुक्याचा आकडा 0 आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1215 जणांचा मृत्यू झाला असून वसई विरार महानगर क्षेत्रात सर्वाधिक 907 मृत्यू झाले आहेत. पालघर तालुक्यात 152, वसई ग्रामीण क्षेत्रात 49, वाडा तालुक्यात 44, डहाणू तालुक्यात 40, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी तालुक्यात अनुक्रमे 8, 6, 5 व 4 मृत्यू झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments