डहाणू: पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूलमधून गोळी सुटली? पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी!

0
2757

डहाणू दि. 24: डहाणू पोलीस स्टेशनमध्ये आज एक महिला पोलीस व पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याकडून पिस्तूलातून प्रत्येकी 1 गोळी सुटल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून हाती आली आहे. याबाबत पोलीसांनी अधिकृतपणे कुठलीही पुष्टी केलेली नसली तरी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची फौज डहाणू पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. पालघर पोलीसांच्या नियंत्रण कक्षाने देखील अजून माहिती मिळाली नसल्याचे कळवले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments