वसई न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन

0
1254

पालघर, दि. 5 : न्यायालयात दाखल विविध स्वरुपाचे खटले सामंजस्य आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी वसई न्यायालयात 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, 138 एन.आय.अ‍ॅक्ट चेक अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसचे दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षकारांनी या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत तालुका विधी सेवा समिती, वसई यांच्याशी संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन वसई जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सुधीर एम.देशपांडे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments