जिल्हाधिकाऱ्यांचा छोट्या विक्रेत्यांना दिलासा; अटी व शर्तींसह आठवडी बाजारावरील बंदी उठवली

0
1025

पालघर, दि. 4 :  पालघर तालुक्यातील कोरोना (कोबिड-१९)  रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार २५ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जारी करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडाभरातच ही बंदी उठवून छोट्या विक्रेत्यांना दिलासा दिला आहे.

आठवडी बाजार बंद केल्याने व्यवसाय, रोजगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने बंदी उठवणे आवश्यक असल्याची माझी धारणा झाली आहे. त्यामुळे पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर व सफाळे येथील आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश उठवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, आठवडी बाजारातील विक्रते व ग्राहक यांनी मास्क घालणे, Handwash / Sanitization करणे, शारीरिक अंतर (Physical Distance) पाळणे व कोविड-१९ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.

Print Friendly, PDF & Email

comments