कच्चे चिकू शितगृहात साठवून ठेवता येतील – डॉ. हेमंत जोशींची सूचना

0
2108

दि. 2 मार्च 2021: चिकू फळाच्या बाजारभावातील सततची अनिश्चितता लक्षात घेता, चिकूची साठवणूक शितगृहात करता येईल व ते फायदेशीर ठरेल असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना व्यक्त केले.

डॉ. हेमंत हे 7 फेब्रुवारी रोजी डहाणूत आले असताना, त्यांचे मित्र बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश भडभडे यांनी त्यांना स्वतःच्या चिकू बागेतील चिकू दिले. घरात माणसे कमी आणि पोते भरुन चिकू आले आहेत. सर्व सहकाऱ्यांना वाटप केल्यानंतरही खूप चिकू उरले. डॉ. हेमंत यांनी हे चिकू घरातील फ्रिजमध्ये ठेवले व रोज गरजेप्रमाणे चिकू बाहेर काढून पिकवायला सुरुवात केली. महिनाभर ते चिकूचा आस्वाद घेत आहेत. बऱ्याच वेळेस चिकूचे भाव तळ गाठतात व चिकू बागायतदार हवालदिल होतात. चिकूची शितगृहात साठवणूक केल्यास त्याचा फायदा होईल असा विश्वास डॉ. हेमंत जोशी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक अभ्यास झाला पाहिजे अशी अपेक्षा डॉ. हेमंत यांनी व्यक्त केली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments