डहाणूच्या सोमवार बाजारावर 15 मार्चपर्यंत बंदी

0
3933

दिनांक 27 फेब्रुवारी 2021: डहाणू नगरपरिषदेच्या हद्दीतील सोमवार बाजार वर 1 मार्च पासून 15 मार्च दरम्यान बंदी जाहीर करण्यात आली आहे. डहाणू शहरातील केटी नगर वसाहतीच्या दक्षिणेकडील बामणपाडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर दर सोमवारी बाजार भरविला जातो. त्यामुळे येथे मोठी गर्दी उसळते. त्या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 चा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ व सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार बाजार बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे डहाणू नगरपरिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments