पालघर, दि. 22 : राज्यात करोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच नागरीकांना लॉकडाऊनची भिती सतावत आहे. अशातच आज पालघर तालुक्यात पुन्हा 10 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर यापुर्वी 19 फेबु्रवारी रोजी 10 नवे रुग्ण आढळून आले होते. काल, 21 फेबु्रवारी रोजी देखील तालुक्यात नव्या 8 रुग्णांची नोंद झाली आहे. पालघर तालुक्यात आजपर्यंत 8 हजार 359 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 8 हजार 159 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. तसेच 151 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.