पालघर : लग्न सोहळ्यांमध्ये करोना नियम पाळदळी, वर पित्यांसह अनेकांवर गुन्हे दाखल

0
1962

पालघर, दि. 22 : तालुक्यातील तीन विविध ठिकाणी आयोजित लग्नसोहळ्यांमध्ये पालघर जिल्हाधिकार्‍यांनी अचनाक भेट देत करोना नियमांची पाहणी केली असता, या लग्नसोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना नियम पाळदळी तुडवण्यात आल्याचे आढळून आल्याने तिन्ही वर पित्यांसह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने शासनाने घालून दिलेल्या करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश पालघर जिल्हाधिकार्‍यांनी नुकतेच दिले होते. तसेच संबंधित अधिकार्‍यांना अशा सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन नियमांचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, याचाच एक भाग म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी उपजिल्हाधिकारी किरण महाजन व तहसिलदार सुनिल शिंदे यांच्यासह पालघर तालुक्यातील सातपाटी गावात, शिरगांवमधील जलदेवी रिसॉर्ट व उमरोळीतील बिरगांव येथे काल, रविवारी आयोजित लग्न सोहळ्यांमध्ये अचानक भेट दिली. यावेळी लग्न सोहळ्यात 50 जणांनाच उपस्थित राहण्याचा नियम असताना सुमारे 500 च्या आसपास लोकांची उपस्थिती तसेच इतर करोना नियमांचे देखील पालन आयोजकांकडुन करण्यात न आल्याचे दिसुन आले. यानंतर तिन्ही वर पित्यांसह, रिसॉर्ट, डीजे व कॅटरर्सच्या मालकांवर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments