डहाणू दि. 3 फेब्रुवारी: डहाणूत 20 वर्षांपासून रुग्णसेवा देणारे डॉ. महेश व डॉ. शिल्पा गुजराथी (श्रीमाळी) या दांपत्याच्या पुढाकाराने प्रसिद्ध मायक्रोबॉयोलॉजीस्ट डॉ. राजेश सोनी यांच्या देखरेखीखाली श्रीजी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी डहाणूमध्ये रुग्णसेवेसाठी सज्ज झाली आहे.
4 फेब्रुवारी पासून शाम अपार्टमेंट (इराणी रोड) येथे सुरु होणाऱ्या या लॅबोरेटरीमध्ये एसआरएल, थायरोकेअर, मेट्रोपॉलीस अशा सर्व प्रकारच्या चाचण्या देखील करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे लॅबोरेटरीतर्फे शुभारंभानिमित्त विशेष सवलत जाहीर करण्यात आली असून 10 फेब्रुवारी पर्यंत अवघ्या 899 रुपयांमध्ये 45 चाचण्यांचा समावेश असलेली मिनी हेल्थ चेकअप व व 1199 रुपयांमध्ये 75 चाचण्यांचा समावेश असलेली फूल बॉडी चेकअप अशा दोन योजना जाहीर केल्या आहेत.