डहाणूच्या आयएमए हाऊसमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न

0
761

दि. 26 जानेवारी: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेतर्फे बांधण्यात आलेल्या आयएमए हाऊसचे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत एका कार्यक्रमात डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास आयएमएच्या डहाणू शाखेच्या सचिव डॉ. ज्योती बापट, अध्यक्ष डॉ. शागिर अत्तार व उपाध्यक्ष डॉ. पूनावाला, विश्वस्त डॉ. जगदीश भडभडे व डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मिहीर शहा उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

डहाणू शहराच्या उत्तर सीमेवरील कंक्राडी येथे हे तळ + 2 मजल्याचे सभागृह, सुसज्ज प्रेक्षागृह व निवासव्यवस्थेचा समावेश असलेल्या ह्या आयएमए हाऊसच्या तळमजल्यावरील सभागृहाचे काम पूर्ण झाले असून आता हे सभागृह लोकांसाठी माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments