केळवा सागरी पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबीर संपन्न; 330 युनिट रक्तसंकलन

0
945

पालघर, दि. 27 : रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्‍वभुमीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन केळवा सागरी पोलीस स्टेशनमध्ये भव्य अशा रक्क्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास परिसरातील सुमारे 700 ते 800 नागरीकांनी उपस्थिती दर्शवली. तर 330 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

26 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 4 वाजेदरम्यान, महाराष्ट्र ब्लड बँकेच्या समन्वयाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केळवा सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी पोलीस स्टेशन परिसरातील नागरींकांमध्ये रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याने तरुण वर्ग व महिलांनी मोठ्या प्रमाणात शिबिरास प्रतिसाद दिला. सुमारे 700 ते 800 नागरीकांनी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थिती दर्शवली. तर पोलीस अधीक्षक कार्यालय व केळवा पोलीस स्टेशनमधील पुरुष व महिला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस पाटील, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी 330 रकक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना केळवा सागरी पोलीस स्टेशनतर्फे टिशर्ट, मास्क, सॅनिटायझर व पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

केळवा सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड, पोलीस उप निरीक्षक हरेश धनगर व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या जनजागृती व नियोजनामुळे रक्तदान शिबीर यशस्वी पार पडले.

Print Friendly, PDF & Email

comments