डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर कारवाई

0
4188

दि. 25 जानेवारी: डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी तडकाफडकी पदभार काढून घेतला आहे. त्यांच्या जागी डहाणूचे तहसिलदार राहुल सारंग यांना पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे सारंग यांनी दुपारी 4.30 वाजता एकतर्फी पदभार स्वीकारला. पिंपळे हे सतत गैरहजर रहात असत व आजही ते गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकरिता उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी नगरपरिषदेवर कामगारांचे आंदोलन झाले असता पिंपळे नसल्यामुळे तोडगा निघू शकला नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केल्याचे सुत्रांकडून समजते.

Print Friendly, PDF & Email

comments