बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्ताने बोईसर येथे रक्तदान; 269 युनिट रक्त संकलन

कुंदन संखे यांच्या वतीने पार पडले रक्तदान शिबीर

0
370

बोईसर, दि. 25 : महाराष्ट्रावर असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने बोईसर येथे भव्य रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 269 युनिट रक्त संकलित करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कुंदन संखे यांच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कारोना काळात यापुर्वी त्यांच्यातर्फे तीन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर आता राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन जनतेला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत व बाळसाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून संखे यांच्यामार्फत बोईसर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एसटी महामंडळाचे कर्मचारी, तरुणवर्ग व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकुण 269 युनिट रक्त संकलन करण्यात आले.

या शिबिरास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कांबडी, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ, लोकसभा सह समन्वयक केदार काळे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख जगदीश धोडी, माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, महिला जिल्हा संघटक ज्योती मेहेर, जिल्हा परिषद गटनेता जयेंद्र दुबळा, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे नाना उतेकर, प्रमोद मेस्त्री, विभागीय सचिव प्रशांत गावडे, तालुका संघटक विधुर पाटील, सरपंच लक्ष्मी चांदणे, विधानसभा संघटक वैभव संखे, नीलम संखे, शिवसेना शहरप्रमुख भूषण संखे, नगरसेवक चंद्रशेखर वडे, शहरसंघटक सुनील महेंद्रकर, नगरसेविका अनुजा तरे, जिल्हा परिषद सदस्या पूर्णिमा धोडी, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, माजी उपसभापती मनोज संखे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास वळवी, उप तालुकाप्रमुख गिरीश राऊत, पंचायत समिती सदस्य राऊत, पंचायत समिती सदस्य मनीषा पिंपळे, उप तालुकाप्रमुख वैभव भोईर, भरत पिंपळे, तालुका युवा अधिकारी दीपक मोरे, जिल्हा युवती अधिकारी दीक्षा संखे, संतोष सावंत, उपशहर संघटक मोनिका गवळी, सचिन संखे, उपसरपंच जगदीश ठाकूर तसेच सामाजिक क्षेत्रातील डॉ. नंदकुमार वर्तक, डॉ. सूर्यकांत संखे तसेच सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments