डहाणूरोड जनता बॅंकेच्या कार्डीॲक ॲम्ब्युलन्सचे प्रजासत्ताकदिनी लोकार्पण

0
1870

दि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेच्या महत्वाकांक्षी अशा कार्डीॲक ॲम्ब्युलन्सचे उद्या (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर बॅंकेच्या मुख्य शाखेसमोर दुपारी 4.30 वा. डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांच्या शुभहस्ते लोकार्पण होत आहे. यामुळे डहाणू व परिसरातील लोकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आरोग्यसेवा मिळविणे शक्य होणार आहे.

बॅंकेचे दिवंगत अध्यक्ष राजेश पारेख यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर बॅंकेचे नवे अध्यक्ष मिहीर शहा यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कार्डीॲक ॲम्ब्युलन्स सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्वरेने अंमलबजावणी केली. कार्डीॲक ॲम्ब्युलन्स हे राजेश पारेख यांचेही स्वप्न होते. आता हे स्वप्न साकार होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments