डहाणू: जयप्रकाश पोंदा यांचा दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय

0
3271

दि. 15 जानेवारी: डहाणू शहरातील ज्येष्ठ नागरिक जयप्रकाश पोंदा यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पोंदा यांचे घर भर रस्त्यात असून डहाणू पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. पोंदा हे सी.ए. होते व निवृत्त जीवन जगत होते. डहाणूरोड रेल्वे स्थानकाच्या नजीक देना बँकेच्यासमोर त्यांचे घर असून तिथे ते एकटेच राहत होते. त्यांच्या घरातून नेमकी काय चोरी झाली याविषयी तपशील समजला नाही.

आज सकाळी पोंदा यांच्या मोलकरणींनी घरात प्रवेश केल्यानंतर ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या आजूबाजूला सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळल्यामुळे हा मृत्यू शंकास्पद वाटला व त्यांनी स्थानिक रिक्षा चालक संघटनेचे नेते जयदेव मर्दे यांच्यामार्फत पोलीसांशी संपर्क साधला. पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केलेल्या दरोडेखोरांनी पोंदा यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments