डहाणू : स्नेहवर्धक मंडळात अध्यक्ष व सचिव विरुद्ध कार्यकारी मंडळ

0
1607

हे देखील वाचा: स्नेहवर्धक मंडळाचे अ. ज. म्हात्रे विद्यालय वादाच्या भोवऱ्यात! 3 महिला शिक्षिकांवर अन्याय! एकीला बडतर्फ केले, दोघींची सेवाज्येष्ठता नाकारली आणि चौथ्या क्रमांकाच्या पुरुषाला मुख्याध्यापक केले! सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला निर्णय फिरवण्याचा प्रयत्न!

दि. 15 डिसेंबर: डहाणूतील नावलौकीक मिळवलेल्या नरपडस्थित स्नेहवर्धक मंडळामध्ये निर्माण झालेला बेबनाव शमताना दिसत नाही. मंडळाच्या कार्यकारी मंडळाने सेवाज्येष्ठ असलेल्या सौ. लता माळी यांना प्रभारी मुख्याध्यापक पदावर नियुक्त करण्याचा घेतलेला निर्णय मानण्यास अध्यक्ष दिव्यनाथ म्हात्रे व सचिव प्रसाद पाटील यांनी नकार दिल्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. हे वाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापर्यंत पोहोचले असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. संस्थेने महिला मुख्याध्यापिका सौ. सुजाता राऊत यांना बडतर्फ केल्यानंतर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे अपील केले आहे. त्यांचे अपील न्याय प्रविष्ट असल्याने त्यांच्या जागेवर प्रभारी मुख्याध्यापकाची नेमणूक करताना संस्थेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत सेवाज्येष्ठता सिद्ध करणाऱ्या पर्यवेक्षीका सौ. लता माळी यांना डावलल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भात शिक्षण सभापती निलेश सांबरे यांच्या दालनात 1 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. शिक्षणाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती समजावण्यासाठी संपूर्ण कार्यकारी मंडळ हजर झाले होते. मात्र प्रभारी मुख्याध्यापक शतृघ्न कांबळे यांनी राजकीय वातावरणात सुनावणी घेण्यास हरकत घेतली. नव्याने 8 डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली असता सर्व कार्यकारी मंडळ उपस्थित राहिले. मात्र अध्यक्ष व सचिव यांनी भारत बंद आंदोलनाचे कारण सांगत दांडी मारली. पुन्हा आज (15 डिसेंबर) आज सुनावणी होत आहे.

दरम्यान अ. ज. म्हात्रे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शतृघ्न कांबळे यांनी 26 सप्टेंबर 2020 रोजी फोन करुन आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप एका महिला शिपायाने केला असून यासंदर्भात संस्थेकडे 1 ऑक्टोबर 2020 रोजी लेखी तक्रार केली होती. या नहिला शिपायाला कांबळे यांनी शालेय पोषण आहाराचे अन्नधान्य दिल्याची माहिती तक्रारीतून स्पष्ट झाली आहे. ही ‘फेवर’ केल्यामुळे महिला शिपायाने कांबळे यांचे ऐकावे अशी अपेक्षा व्यक्त केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. शाळेमध्ये महिलांच्या तक्रारीचे निवारण करणारी विशाखा समिती नसल्याने व संस्थेचे अध्यक्ष व सचिव समर्थक असल्याने शतृघ्न कांबळेच्या विरोधातील महिला शिपायाच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

चला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनू या!

दैनिक राजतंत्रची योजना आहे …. गाव तेथे Social Reporter‘ … ही योजना समजून घेण्यासाठी पुढील Link ला भेट द्या! – http://rajtantra.com/?p=15559

तुम्हाला जर Social Reporter ONLINE Workshop विषयी माहिती हवी असेल तर खालील Link ला भेट द्या! –
http://rajtantra.com/?p=15553

Social Reporter Online Workshop साठी रुपये 650/- शुल्क भरण्यासाठी पुढील Link चा वापर करा! … https://www.instamojo.com/@RAJTANTRA/l25d165af40e441629496cf2f43dbd8c6/

Print Friendly, PDF & Email

comments