आयुर्वेदीक डॉक्टरांनी ॲलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध!

0
1113

दि. 14 डिसेंबर: केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदीक डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणक्रमात 58 प्रकारच्या ॲलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिल्याच्या कथित निर्णयाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दंड थोपटले असून 11 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन करुन आपला विरोध प्रकट केला आहे. डहाणूच्या आयएमए शाखेने देखील अत्यावश्यक रुग्णसेवा वगळून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवली होती. जनता बॅंक चौक येथे निदर्शने देखील करण्यात आली.

आयएमएचे प्रमुख आक्षेप:

  • ॲलोपॅथिक शस्त्रक्रियांचे नामांतर संस्कृत शब्दात करुन त्या आयुर्वेदीक शस्त्रक्रिया असल्याचा दावा खोटा.
  • एकच आयुर्वेदीक डॉक्टर ॲपेन्डीक्स, किडनी स्टोन, कानांचे, डोळ्यांचे, हाडांचे, दातांचे, पित्ताशयातील खडा काढणे अशा शस्त्रक्रिया करु शकेल. हा रुग्णांच्या जिवाशी खेळ ठरेल.
  • ॲलोपॅथिक डॉक्टरांना दिली जाणारी एम. एस. (शल्य चिकित्सक) ही पदवी आयुर्वेदीक डॉक्टरांना प्रदान करणे गोंधळ निर्माण करणारे.
  • ॲलोपॅथी व आयुर्वेद ह्या विभिन्न संकल्पना असताना त्यांचे एकत्रीकरण करणे.
आयएमएच्या डहाणू शाखेतर्फे जनता बॅंक चौक येथे करण्यात आलेली निदर्शने

आयएमएच्या प्रमुख मागण्या:

  • काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने घेतलेला प्रस्तुत निर्णय मागे घ्यावा.
  • वैद्यकीय अभ्यासक्रमांची सरमिसळ करण्यासाठी गठीत केलेल्या 4 समित्या बरखास्त कराव्यात.
  • दोन विभिन्न शास्त्रांची सरमिसळ करुन त्यांचे पावित्र्य नष्ट करु नये.
  • आयुर्वेदीक डॉक्टरांना एम. एस. पदव्या देऊन रुग्णांची दिशाभूल करु नये.
Print Friendly, PDF & Email

comments