पालघर (ग्रामीण) जिल्ह्यात आतापर्यंत 14,524 रुग्णांनी केली करोनावर मात, केवळ 109 रुग्णांवर सध्या उपचार सुरु!

0
933

पालघर, दि. 14 : पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) करोनाचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी नियंत्रणात आला असुन एकेकाळी 100 ते 150 च्या गतीने वाढणारा करोना रुग्णांचा आकडा आता केवळ दैनंदिन 8 ते 10 च्या आसपास दिसुन येत आहे. विशेष म्हणजे आजघडीला (दि.14) जिल्ह्यातील करोनाची लागण झालेल्या 14 हजार 931 जणांपैकी 14 हजार 524 जणांनी या आजारावर यशस्वी मात केली असुन सध्यस्थितीत 109 रुग्णांवर विविध करोना सेंटर्समध्ये उपचार सुरु आहेत. तर 289 रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, शासनातर्फे आतापर्यंत 1 लाख 6 हजार 699 रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 118 जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

आज, 14 डिसेंबर रोजी जिल्ह्यात एकुण 9 रुग्ण आढळून आले असुन यात डहाणूतील 8 व पालघरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर इतर तालुक्यात आज एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments