एक जानेवारीपासून वसईत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र; इच्छूकांनी लाभ घेण्याचे आवाहन

0
2133

पालघर, दि. 9 : वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र येत्या 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिने मुदतीचे असून यामध्ये मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागांची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने आदींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार असुन इच्छूकांनी या सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाकरिता दारिद्य्र रेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून दरमहा 450 रुपये व दारिद्य्र रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून 100 रुपये शुल्क आकारले जाते. प्रशिक्षणाकरिता उमेदवार किमान 4 थी पास व 18 ते 35 वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात, मच्छिमार संस्थेचे शिफारसपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व एक फोटोसहीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था इमारत, पाचुंदर-वसई या पत्त्यावर पाठवावेत. तसेच अधिक माहिती करिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील यांच्या मो. क्र. 9892103235 किंवा श्रीकांत इंगळे यांच्या 9420186870 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments