डहाणूत आढळलेल्या अतिदुर्मिळ पाखरु माशाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी

0
3040

डहाणू, दि. 7 : तालुक्यातील वाढवण समुद्र किनारी नुकताच अतिदुर्मिळ समजला जाणारा पाखरु मासा (फ्लाईंग फिश) आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात या माशाचीच चर्चा रंगली असुन त्याला पाहण्यासाठी वाढवण समुद्र किनारी लोक गर्दी करत आहेत. जर्नादन दळवी या स्थानिक मच्छीमाराच्या जाळ्यात हा मासा आढळून आला होता.

शरिरावर पंख असलेला हा मासा पक्ष्यांप्रमाणे हवेत उडत नसला तरी तो आपल्या पंखाच्या साहाय्याने काही वेळ पाण्याबाहेर तरंगू शकतो. अशाप्रकरचा मासा प्रथमच डहाणू तालुक्यातील समुद्र किनारी आढळून आला असुन उष्ण प्रदेशातील समुद्र किनारी या माशाचा वावर पाहायला मिळत असल्याचे जाणकार सांगतात. एकुणच डहाणू तालुक्याच्या समुद्र किनार्‍यावर असा दुर्मिळ मासा आढळून आल्याने परिसरातील लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असुन हा मासा पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments