प्रस्तावित वाढवण बंदराला वाढता विरोध; आमदार निकोले व भूसारांनी देखील मुठी आवळल्या!

0
1131

दि. 6 डिसेंबर: प्रस्तावित वाढवण बंदराला होत असलेल्या विरोधाला आता पाठिंबा वाढत आहे. डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा विक्रमगडचे आमदार सुनील भूसारा यांनीही बंदराला विरोध व्यक्त केला असून पुढील टप्प्यात आंदोलनाला बळ देण्याची भूमिका व्यक्त केली आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात देखील हे आमदार विरोध व्यक्त करणार आहेत.

काल, डहाणूच्या शासकीय विश्रामगृह येथे वाढवण बंदर विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस आमदार निकोले व भूसारा, भुमिसेनेचे काळूराम धोदडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा किर्ती मेहता, युवक जिल्हा अध्यक्ष वरुण पारेख, नगरसेवक तन्मय बारी, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष मोरे, कॉम्रेड चंद्रकांत घोरखना यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनू या!

दैनिक राजतंत्रची योजना आहे …. गाव तेथे Social Reporter‘ … ही योजना समजून घेण्यासाठी पुढील Link ला भेट द्या! – http://rajtantra.com/?p=15559

तुम्हाला जर Social Reporter ONLINE Workshop विषयी माहिती हवी असेल तर खालील Link ला भेट द्या! –
http://rajtantra.com/?p=15553

Social Reporter Online Workshop साठी रुपये 650/- शुल्क भरण्यासाठी पुढील Link चा वापर करा! … https://www.instamojo.com/@RAJTANTRA/l25d165af40e441629496cf2f43dbd8c6/

Print Friendly, PDF & Email

comments