जव्हार, दि. 5 : पत्नीसोबत सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पित्याची मुलानेच धारधार कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना जव्हारमधील झाप येथे घडली आहे. शिवराम धाकल्या पोटींदा (वय 65) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असुन आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिवराम पोटींदा यांचा मुलगा सुनिल पोटींदा याचे आपल्या पत्नीसोबत वाद झाले. या वादाचे रुपांतर पूढे मारहाणीत होऊन सुनिल पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचे पाहून शिवराम पोटींदा हे भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र या गोष्टीचा राग आल्याने संतापलेल्या सुनिलने हातातील कोयत्याने शिवराम यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. जव्हार पोलिसांना याबाबत खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेत काल, 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी आरोपी मुलाला अटक केली.
दरम्यान, याप्रकरणी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी अधिक तपास करीत आहेत.