डहाणू तालुक्यातील 85 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर; 43 ग्रामपंचायती अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव! … सविस्तर यादी पहा

0
1658

डहाणू दि. 29: आगामी निवडणूकांसाठी डहाणू तालुक्यातील 85 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. 27 नोव्हेंबर रोजी डहाणूचे तहसिलदार राहुल सारंग यांच्या अध्यक्षतेखाली के. एल. पोंदा हायस्कूल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत ही सोडत काढण्यात आली. यावेळी 64 सरपंच, ग्राम सदस्य, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते. तालुक्यातील सर्व 85 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव असून त्यातील (50%) 43 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. मागील कालावधी महिला राखीव असलेल्या ग्रामपंचायतींना आरक्षणातून वगळले असले तरी राई या एकमेव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर दुसऱ्यांदा महिला सरपंच बसणार आहे. हे आरक्षण पुढील 5 वर्षांसाठी लागू असेल.

अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित सरपंचपद असलेल्या ग्रामपंचायती:

1. नरपड 2. चिंबावे 3. वणई 4. साखरे 5. वाणगांव 6. तणाशी 7. कोलवली देदाळे 8. वाढवण 9. चरी- कोटबी 10. कैनाड 11. कंक्राडी 12. रणकोळ 13. निकणे 14. कासा 15. वेती – वरोती 16. सारणी 17. चळणी 18. नागझरी 19. चिंचले 20. धुंदलवाडी 21. बहारे 22. आंबोली 23. शिसणे 24. शेणसरी 25. जांबूगाव 26. सोगवे 27. आंबेसरी 28. गांगणगाव 29. वंकास 30. दापचरी 31. मोडगांव 32. किन्हवली 33. दाभोण 34. गोवणे 35. कापशी 36. चिंचणी 37. चारोटी 38. दाभाडी 39. पोखरण 40. गुंगवाडा 41. धाकटी – डहाणू 42. धूमकेत 43. राई

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचपद असलेल्या उर्वरीत ग्रामपंचायती:

1. अस्वाली 2. घोलवड 3. रामपूर 4. चिखले 5. दाभले 6. आसनगांव 7. बावडे 8. वरोर 9. वांसगाव 10. चंडिगाव 11. डेहणे 12. आगवन 13. सरावली 14. जामशेत 15. आसवे 16. आशागड 17. वाकी 18. उर्से 19. रानशेत 20. मुरबाड 21. तवा 22. वाघाडी 23. गंजाड 24. रायतळी 25. दहयाळे 26. विव्हळवेढे 27. धानिवरी 28. निंबापूर 29. धामणगाव 30. रायपूर 31. शिलोंडा 32. सायवन 33. दिवशी 34. सासवंद – तलोठे 35. हळदपाडा 36. धरमपूर 37. बापुगाव 38. बोर्डी 39. सावटे 40. बाडापोखरण 41. तडियाळे 42. ओसरविरा

Print Friendly, PDF & Email

comments