पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट मेल आयडी?

0
1332

पालघर दि.17 :- पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट मेल आयडी तयार केल्याचे समोर आले असून हा मेल आयडी अधिकृत नसल्याचा खूलासा जिल्हाधिकारी गुरसळ यांनी केला आहे. Dr.Manik Gursal I. A. S [email protected] असा हा बोगस मेल आयडी असून आपण कोणालाही मेल केलेला नाही. अशा प्रकारच्या बनावट इमेल द्वारे फसवणूक टाळण्यासाठी त्यास कोणीही कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

काही शासकीय अधिकाऱ्यांना या मेल आयडी वरून वैयक्तिक मेल गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना विचारणा केली असता हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सायबर सेल मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उप निरीक्षक दीपाली लंभाते पुढील तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments