16 नोव्हेंबर पासून धार्मिक स्थळे खुली

0
948

दि. 15 नोव्हेंबर: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये मागील 7 महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे आता दीपावली पाडव्यापासून (16.11.2020) पुन्हा भाविकांसाठी खूली होणार आहेत. काल उशीरा महाराष्ट्र सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे लोकांना नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणे शक्य होणार आहे. धार्मिक स्थळे सुरु करताना भाविकांची थर्मोमिटरद्वारे तपासणी व हॅन्ड सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुण्याची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

देवदर्शनासाठी लोक तरसत असले तरी सरकारने आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या काळजीतूनच कोरोना नियंत्रणासाठी निर्णय घेतला होता. आता लोकांना भक्तीभावाने देवदर्शन घेणे व संकट निवारणासाठी देवाकडे साकडे घालणे शक्य होणार आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. आम्ही शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ. – सुधाकर राऊत (अध्यक्ष – साईनाथ मंदिर ट्रस्ट, नरपड)

Print Friendly, PDF & Email

comments