डहाणू भाजप शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा भरत शहा

0
1802

डहाणू दि. 9: भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदावर पुन्हा एकदा भरत शहा यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. पालघरचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, संघटक बाबाजी काठोळे, माजी आमदार पास्कल धनारे यांनी थेट डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या कार्यालयामध्ये येऊन जाहीर केले. यातून भाजपामध्ये डहाणू शहरात आवाज भरत राजपूतांचाच चालेल हे स्पष्ट झाले आहे.

भाजपमधून राजकीय कारकीर्द सुरु केलेले भरत शहा हे भरत राजपूत यांच्यावर प्रभावित होऊन कॉंग्रेसमध्ये गेले होते. ते डहाणू नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केचे माजी संचालक असून 2014 मध्ये त्यांनी राजपूत यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते शहर अध्यक्ष पदावर आहेत. त्यांना तिसऱ्यांदा शहर अध्यक्षपद देण्यास जिल्हा कार्यकारिणीने विरोध केला होता. पास्कल धनारे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र राजपूत यांच्या विरोधात जाऊन शहर अध्यक्षपदाच्या स्पर्धेत येण्यास कोणी तयार झाले नाही. भाविन पारेख हा एकमेव पर्याय समोर उभा राहिला होता. पारेख यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र राजपूत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे समर्थकांसह स्वागत केल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले व भाजपतर्फे यु टर्न घेण्यात आला. थेट भरत राजपूत यांच्या कार्यालयात येऊन भरत शहा यांना शहराध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments