पोलीस हुतात्मा दिन : पालघर पोलीस दलाकडून शहीद जवानांना श्रद्धाजंली

0
1636

पालघर, दि. 21 : आज, 21 ऑक्टोबर रोजी संपुर्ण भारतभर पोलीस हुतात्मा दिन म्हणुन पाळला जातो. या दिवशी शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून देखील हुतात्मा स्मृती स्तंभास पुप्षचक्र अर्पण करुन श्रद्धाजंली वाहण्यात आली.

  • 20 ऑक्टोबर 1959 रोजी लेह लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादीत व निर्जन अशा हॉट स्प्रिंग भागात गस्तीसाठी गेलेले दोन कर्मचारी पुन्हा छावणीत न परतल्याने 21 ऑक्टोबर 1959 रोजी त्यांचा शोध घेण्याकरिता इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचे डी.वाय.एस.पी. करणसिंग यांच्या अधिपत्याखाली सीआरपीएफ आणि आय.टी.बी.पी. चे दोन अधिकारी व 20 कर्मचारी पाठविण्यात आले. यावेळी त्यांच्यावर दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक केलेल्या हल्ल्याला कडवे आवाहन देत या जवानांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. त्यात 10 जवान वीरगतीला प्राप्त झाले. हे शौर्य इतिहासात गौरवशाली स्मृतीचिन्ह बनले. त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ देशभरातील सर्व पोलीस दलातर्फे दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणुन पाळला जातो.

या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यापासुन इतरांना स्फुर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्र निष्ठेची, जाणीव व्हावी म्हणुन शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक 21 ऑक्टोबर हा दिवस संपुर्ण भारतभर पोलीस हुतात्मा दिन या नावाने पाळला जातो.

आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी हुतात्मा स्मृती स्तंभास पुप्षचक्र अर्पण करुन शहीद पोलीस जवानांना श्रद्धाजंली वाहिली. तर 1 सप्टेंबर 2019 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत कर्तव्य बजावित असताना धारातिर्थी पडलेल्या देशभरातील 261 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नावांचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व पोलीस उपअधीक्षक (गृह) शैलेश काळे यांनी वाचन करुन पालघर पोलीस दलाकडुन रायफलच्या तीन वेळा फैरी झाडुन शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.

Print Friendly, PDF & Email

comments