पालघर, दि. 18: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे टोल वसूल करणारे कंत्राटदार आय.आर.बी. कंपनीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
मानव अधिकार मिशन या संस्थेचे पदाधिकारी हरबन्स सिंग नन्नाडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा इशारा देण्यात आला आहे. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिका सेवा देणे आय.आर.बी. वर बंधनकारक आहे. मात्र आय.आर.बी. च्या चारोटी नाका टोल नाक्याच्या सेवेतील रुग्णवाहिका रुग्णाला थेट ट्रॉमा केअर सेंटर पर्यंत न घेऊन जाता नजीकच्या कासा किंवा मनोर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सोडून पळ काढते अशी नन्नाडे यांची तक्रार होती.

