पालघर, दि. 17: पालघर जिल्ह्यातील मागील 15 दिवसांची (1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर) कोरोना विषाणू संसर्गाची आकडेवारी दिलासादायक ठरली आहे. विक्रमगड व तलासरी तालुक्यात एकही मृत्यू उद्भवलेला नाही. विरार वसई महानगर क्षेत्रातील आकडेवारी फारशी नियंत्रणात नसली तरी आशादायक आहे.
• विरार वसई महानगर क्षेत्रामध्ये 15 दिवसांत 2319 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 2721 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 479 ने कमी झाली असली तरी 77 मृत्यू झाले आहेत. (एकूण मृत्यू 522)
• वसई ग्रामीण क्षेत्रामध्ये 15 दिवसांत 84 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 105 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 24 ने कमी झाली असून 5 मृत्यू झाले आहेत. (एकूण मृत्यू 47)
• पालघर तालुक्यामध्ये 15 दिवसांत 564 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 936 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 385 ने कमी झाली असून 13 मृत्यू झाले आहेत. (एकूण मृत्यू 135)
• वाडा तालुक्यामध्ये 15 दिवसांत 138 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 264 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 134 ने कमी झाली असून 8 मृत्यू झाले आहेत. (एकूण मृत्यू 36)
• मोखाडा तालुक्यामध्ये 15 दिवसांत अवघे 10 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 39 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 32 ने कमी झाली असून फक्त 1 रुग्ण दाखल आहे. असे असले तरी 3 मृत्यू वाढले आहेत. (एकूण मृत्यू 5)
• डहाणू तालुक्यामध्ये 15 दिवसांत 147 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 223 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 78 ने कमी झाली असून 2 मृत्यू झाले आहेत. (एकूण मृत्यू 39)
• जव्हार तालुक्यामध्ये 15 दिवसांत 41 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 69 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 30 ने कमी झाली असून 2 मृत्यू झाले आहेत. (एकूण मृत्यू 5)
• विक्रमगड तालुक्यामध्ये 15 दिवसांत 23 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 32 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 9 ने कमी झाली असून एकही मृत्यू झाला नाही. (एकूण मृत्यू 8)
• तलासरी तालुक्यामध्ये 15 दिवसांत 27 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 23 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 4 ने कमी झाली असून एकही मृत्यू झाला नाही. (एकूण मृत्यू 4)