राजेश नागशेट यांचे यकृताच्या आजाराने निधन

0
3963

डहाणू दि. 11 ऑक्टोबर: राजेशकुमार हिराचंद नागशेट यांचे आज (रविवार) पहाटे 2.30 वाजता यकृताच्या आजाराने निधन झाले आहे. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व 2 मुली, आणि काका, 2 बंधू व त्यांचे कुटूंबीय असा परिवार आहे.ते डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक तथा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार नागशेट यांचे जुळे बंधू होते.

राजेश मागील काही महिन्यांपासून लठ्ठपणा व त्यातून निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यांना यकृताचा आजार देखील जडला होता. अलीकडेच त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात (मुंबई) दाखल करण्यात आले असता यकृत काम करीत नसल्याचे निदान झाले होते. यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता. त्यांची पत्नी व भाऊ राजकुमार यांच्या त्यादृष्टीने तपासण्याही झाल्या होत्या व त्यांच्या यकृतांचे हिस्से राजेशकुमार यांच्या प्रत्यारोपणासाठी वापरले जाणार होते. त्यासाठीच्या तपासण्या व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. मात्र दरम्यान पुन्हा त्रास जाणवू लागल्याने आठवड्याभरापूर्वी त्यांना वापीच्या “21st सेंच्युरी” रुग्णालयात दाखल करण्यात आले. 9 ऑक्टोबर पासून त्यांना व्हेंटीलेटर वर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांची किडणी देखील निकामी झाली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 10 पर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी (प्रगती, मेन रोड,डहाणू) आणले जाईल व त्यानंतर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.

Print Friendly, PDF & Email

comments