विरारमध्ये सव्वा लाख रुपये किंमतीच्या अफीमसह एकाला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
1600

विरार, दि. 15 : पालघर स्थानिक गुन्हे शाखेने विरार पूर्वेतील आर.जे. नाका परिसरातून एका कारचालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचा अफीम नावाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई यूनिटने गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीवरुन काल (दि.14) संध्याकाळी 6.10 वाजेच्या सुमारास आर.जे. नाका परिसरात एम.एच.04/ए.एक्स. 3240 या क्रमांकाच्या मारुती झेन गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीत 250 ग्राम वजनी व सुमारे 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचा अफीम नावाचा अंमली पदार्थ आढळून आला. यानंतर पोलिसांनी अफीम व कार ताब्यात घेत कारचा चालक ओमप्रकाश भगाराम पटेल (वय 27) याला अटक केली आहे.

याप्रकरणी आरोपीविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments