जिल्हाधिकारी डॉ. गुरसूळ यांचा भूकंपग्रस्त भागात दौरा

0
1041

दिनांक 8 सप्टेंबर: पालघरचे नवे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसूळ यांनी डहाणू व तलासरी तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या गावांना भेट दिली. सासवद येथील श्रीमती अंती डोंगरे यांच्या कोसळलेल्या घराला भेट देऊन कुटुंबाची विचारपूस केली व सरकारी मदतीची हमी दिली. त्यांनी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलला देखील भेट दिली व तेथील कोरोनाबाधीत रुग्णांची विचारपूस केली.

जिल्हाधिकारी यांनी धुंदलवाडी आश्रम शाळेमध्ये अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेऊन भूकंप तसेच कोव्हीड 19 साथरोग नियंत्रित करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत सहायक जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी श्री बी एच भरक्षे, पंचायत समिती सभापती श्रीमती सातवी, धुंदलवाडीचे सरपंच महाले उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments