पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदेंची बदली; एम. जी. गुरसळ नवे जिल्हाधिकारी

0
3376

पालघर, दि. 3 : पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबईतील शुल्क नियामक प्राधिकरण सचिवपदी कार्यरत असणार्‍या एम. जी. गुरसळ यांची नेमणूक करण्यात आली असुन त्यांनी काल, 2 सप्टेंबर रोजीच पदभार स्विकारला.

गुरसळ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असुन त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये विविध पदावर आपले कर्तव्य बजावले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरसळ यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पालघरचे प्रांतधिकारी धनाजी तोडसकर, तहसीलदार सुनील शिंदे व उज्वला भगत आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments